विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ७५ वर्षीय नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी आपण ऐकली असल्याचे तनुश्रीने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मात्र, सध्या आपले लक्ष लखनऊमधील एका कार्यक्रमावर केंद्रित करायचे असून, या घटनेवर नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरवण्यासाठी आपल्याला वेळ हवा असल्याचे तिने सांगितले.
“मी बातमी ऐकली आहे…”
तनुश्री दत्ताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले की, तिने नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकली आहे. त्या दिवशी तिचा कामाचा दिवस असून ती एका कार्यक्रमासाठी लखनऊला जात असल्याचे तिने सांगितले.
लखनऊमध्ये तिचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याने सध्या त्यावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचेही तनुश्रीने स्पष्ट केले. आपल्या दिवसाचे नियोजन आधीच केले होते आणि सोशल मीडियावर लाइव्ह तसेच इतर कंटेंट पोस्ट करण्याचा विचार होता, असे तिने सांगितले.
“नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरवेन…”
या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया देण्याऐवजी आपली भूमिका काय असावी, हे ठरवल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देणार असल्याचे तनुश्रीने म्हटले. “मी नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरवल्यानंतर माझी प्रतिक्रिया देईन,” अशा आशयाचे वक्तव्य तिने केले.
मात्र, या व्हिडीओमध्ये तिने नाना पाटेकर यांचे थेट नाव घेतलेले नाही. त्याचवेळी तिने त्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत.
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील वाद
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचे नाव २०१८ मध्ये ‘MeToo’ मोहिमेदरम्यान चर्चेत आले होते. तनुश्रीने २००९ मध्ये Horn ‘Ok’ Pleassss चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. नाना पाटेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी झाली होती. २०१९ मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या B-Summary अहवालात तक्रारीबाबत पुरावे नसल्याचे नमूद करण्यात आले आणि प्रकरणात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुढील कारवाई झाली नाही.
तनुश्रीच्या प्रतिक्रियेकडे लक्ष
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे त्यांच्या जुन्या वादाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तनुश्रीने अद्याप नाना पाटेकर यांचे नाव घेऊन सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. तिने कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करत, आपली सविस्तर भूमिका नंतर स्पष्ट करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तिची पुढील प्रतिक्रिया काय असणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका प्रदीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीचा अंत झाला आहे. त्यांच्या अभिनयातील विविधांगी भूमिका आणि वैशिष्ट्यपूर्ण संवादफेकीमुळे त्यांनी अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनानंतर कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App