नाशिक : केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
केरळमध्ये काँग्रेसने मुस्लिम लीग बरोबर आघाडी करून कम्युनिस्ट सरकारचा पराभव केला. काँग्रेसने त्यानंतर व्ही. डी. सतीशन यांना मुख्यमंत्री केले. सतीशन यांनी मुस्लिम लीगच्या ५ आमदारांना केरळच्या मंत्रिमंडळात मंत्री केले. सतीशन यांनी जमाते इस्लामी संघटना आणि मुस्लिम लीग पक्ष या दोघांनीही धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट दिले. पण एवढे सगळे करून सुद्धा सतीशन यांचे सगळे मुसळ केरात गेले. कारण केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी व्ही. डी. सतीशन यांची तुलना व्ही. डी. सावरकरांशी करून त्यांचा पापड मोडला.
– त्याचे झाले असे :
केरळ मध्ये कम्युनिस्टांचे सरकार जाऊन काँग्रेसचे सतीशन यांचे सरकार आले. सतीशन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज केरळचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांच्या कन्येच्या घरांवर सक्तवसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने छापे घातले. कोचीन मिनरल्स एंड रूटाइल लिमिटेड कंपनी मधील मनी लॉन्ड्रीग प्रकरणात हे छापे घातले. केरळमध्ये एकूण १२ ठिकाणी हे छापे घातले. त्यापैकी दोन ठिकाणी म्हणजे पिनराई विजयन यांच्या घरावर आणि त्यांची मुलगी वीणा विजयन यांच्या घरावर छापे घातले. हे मनी लॉन्ड्रीगचे प्रकरण जुने असून यापूर्वी सुद्धा ईडीने अनेक ठिकाणी छापे घातले होते. पण पिनराई विजयन हे आधी मुख्यमंत्री पदावर असल्याने ईडी त्यांच्या निवासस्थानावर छापे घालू शकली नव्हती. ते छापे आज घातले.
Kannur | Over ED raid at former Keralam CM & CPI(M) leader Pinarayi Vijayan's residence, party leader KK Ragesh says, "It is Modi's move to destroy the Left. We will face the legal and political challenges." "Satheesan is a person who is in league with the BJP and RSS. There is… pic.twitter.com/i8kVRyx3Sa — ANI (@ANI) May 27, 2026
Kannur | Over ED raid at former Keralam CM & CPI(M) leader Pinarayi Vijayan's residence, party leader KK Ragesh says, "It is Modi's move to destroy the Left. We will face the legal and political challenges."
"Satheesan is a person who is in league with the BJP and RSS. There is… pic.twitter.com/i8kVRyx3Sa
— ANI (@ANI) May 27, 2026
त्यामुळे व्ही. डी. सतीशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा आणि आजच्या ईडीच्या छाप्यांचा एकमेकांशी काही संबंध नव्हता.
– बादरायणी संबंध
पण केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी पिनराई विजयन यांच्या घरावरील छाप्यांचा बादरायणी संबंध सतीशन आणि मोदी यांच्या भेटीशी जोडला. ईडी आता संघ आणि भाजप यांच्या परिवारातील घटक बनल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी केली. मूळात कोर्टात केस चालू असताना ईडीने कोर्टाच्या परवानगीशिवाय छापे घातल्याचा आरोप एनी राजा यांनी केला.
– सतीशन यांची सावरकरांशी तुलना
पण खरी कमाल तर कम्युनिस्ट नेते के. के. रागेश यांनी केली. त्यांनी मोदी सरकारवर कम्युनिस्टांना बरबाद करायचा आरोप केलाच, पण त्या पलीकडे जाऊन व्ही. डी. सतीशन यांच्या इनिशियलचा व्ही. डी. सावरकर यांच्याशी बादरायणी संबंध जोडून सावरकरांची बदनामी केली. मोदी सरकारला कम्युनिस्टांना बरबाद करायचे आहेच. पण सतीशन हे सुद्धा काही कमी नाहीत. ते काँग्रेस मध्ये घुसलेले मुस्लिम लीगी नेते आहेत. व्ही. डी. सतीशन आणि व्ही. डी. सावरकर यांच्यात काही फरक नाही. ते अगदी सेम टू सेम आहेत, अशी आदळआपट के. के. रागेश यांनी केली. यातूनच केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, ही वस्तुस्थिती समोर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App