विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : : Sanjay Shirsat राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी दिलेला आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थितीनुसार बोलेन, पण शिंदे साहेबांना विचारूनच बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.Sanjay Shirsat
संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात असून, त्यांना स्वतःच्या पक्षात कोणत्या नेतृत्वाखाली काम करावे असा प्रश्न पडला आहे; त्यांच्या पक्षात काय चालले आहे हे काही दिवसांतच कळेल, असा दावा केला होता. शिरसाट यांच्या या दोन विधानांमुळे राष्ट्रवादीच्या गोटातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
काही लोकांनी भीतीपोटी इंधनाचा साठा सुरू केला
संजय शिरसाट म्हणाले की,सध्या शेतकरी आणि सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलची अत्यंत गरज आहे. काही ठिकाणी लोकांनी भीतीपोटी इंधनाचा साठा सुरू केला आहे, परंतु तसे करण्याची अजिबात गरज नाही. सरकार यावर पूर्ण नियंत्रण ठेवून असून, टंचाई लवकरच दूर केली जाईल.
राऊतांच्या टीकेला किंमत देत नाही
संजय शिरसाट म्हणाले की,संजय राऊत यांच्या टीकेला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. त्यांना आमची होत असलेली प्रगती सहन होत नाही, त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा उरलेला पक्ष सांभाळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही तालुका पातळीवर पक्ष वाढीचे काम वेगाने करत आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App