पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश!!

 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र National Commission for Women

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पुण्यात एका महिलेवर कथित ॲसिड हल्ला आणि तिच्यावर झालेला अत्यंत क्रूर घरगुती छळ यांबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिलला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती दारू पिऊन घरी आला. तू कामावर जातेस, तुझे कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग, असे म्हणत त्यांनी पत्नीला मारहाणीस सुरुवात केली. तो नराधम पती एवढ्यावरच थांबला नाही, तर तुला मुलगा होत नाही. तुझी अवघड जागाच जाळून टाकतो, अशी धमकी त्याने दिली.

त्यानंतर त्याने पोटमाळ्यावरून टॉयलेट साफ करण्याची ॲसिडची बाटली काढून पत्नीला जोरात खाली ढकलले आणि तिच्या गुप्तांगावर थेट ॲसिड ओतले. पीडितेने जीवाच्या आकांताने ओरडत बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने दरवाजा आतून लावून घेत पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेजारी राहणाऱ्या जावेने पीडितेच्या सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले, तेव्हा “कोणाला काही सांगितले तर जीवे मारीन,”अशी धमकी देत पती घरातून पळून गेला.



विजयाताई रहाटकर यांचे पत्र

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा, विजयाताई रहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून, या प्रकरणी तात्काळ, कठोर आणि कालमर्यादेत (वेळेच्या चौकटीत) कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचबरोबर चौकशी आणि तपास या संदर्भात सात दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचेही निर्देश दिले.

या प्रकरणी नोंदवण्यात आलेला एफआयआर भारतीय न्याय संहितेअंतर्गत लागू करण्यात आलेली कलमे, तपासाची सद्यस्थिती, आरोपीची अटक व पोलीस कोठडीतील चौकशी, पीडितेचे वैद्यकीय उपचार व न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणी, गुन्ह्यात वापरलेल्या रासायनिक पदार्थाची जप्ती, तसंच पीडितेची सुरक्षा, संरक्षण आणि पुनर्वसन यांसाठी उचललेली पावले या सर्व बाबींवर आधारित सविस्तर अहवाल आयोगाने मागविला.

राष्ट्रीय महिला आयोगाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, ॲसिड हल्ले, घरगुती छळ आणि महिलांवरील हिंसाचार यांसारखे गुन्हे हे अत्यंत घृणास्पद स्वरूपाचे असतात आणि अशा गुन्ह्यांबाबत कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई होणे अनिवार्य आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

Husband attacks wife with acid; National Commission for Women takes action

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात