विशेष प्रतिनिधी
नाशिक : टीसीएस कॉर्पोरेट जिहादची मास्टर माईंड निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक केल्यानंतर आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आले. नाशिक कोर्टाने तिला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. निदा खान हिला असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्या एआयएमआयएम पक्षाचा छत्रपती संभाजी नगर मधला नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. Nida Khan
निदा खान आणि इम्तियाज जलील यांचे राजकीय संबंध पोलिसांनी उघड केले. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याविरुद्धही पोलिसांनी तपासाचा फास आवळला. पण तरीसुद्धा जलील यांनी निदा खान तिचे समर्थन करणे सोडले नाही. न्यायालयाने तिला जामीन नाकारला आणि पोलिसांनी अटक केली म्हणून तिला कोणी दहशतवादी ठरवू शकत नाही, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.
निदा खान हिने आपण गरोदर असल्याचा दावा करून कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाने तो फेटाळला तरी सुद्धा ती फरारच राहिली होती. काल रात्री तिला पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर मधून अटक केली. त्यानंतर तिची प्रेग्नेंसी टेस्ट केली त्यावेळी ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आज नाशिक कोर्टामध्ये हे सगळे तथ्य मांडले. त्यावेळी नाशिक कोर्टाने निदा खान हिला 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App