विशेष प्रतिनिधी
नाशिक : Nashik कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याच गुन्ह्यात कारागृहात असलेली संशयित एचआर हेड अश्विनी चेनानी हिने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.Nashik
मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल बलात्कार, विनयभंग, धर्मांतर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले संशयित तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी, रझा रफिक मेमन या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. संशयितांना सुरुवातीला २९ एप्रिलपर्यंत, त्यानंतर २ मे आणि पुन्हा ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीत संशयितांनी अनेक धक्कादायक कृत्यांची कबुली दिली.Nashik
निदा खान अद्याप फरारच
या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अटक झालेले संशयित व पीडित तरुणी यांच्यातील प्रमुख दुवा असलेली निदा खान अजूनही फरारच आहे. २ मे रोजी झालेल्या तिसऱ्या सुनावणीत कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिला केव्हाही अटक केली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App