महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये वाढ १३०० लाख मनुष्य दिवसांवरून १६०० मनुष्य दिवस; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Chief Minister

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगाचे नामांतर करून व्हीबी-जी रामजी (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी-ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे आभार मानले आहेत.Maharashtra’s labor budget increased from 1300 lakh man-days to 1600 man-days; Chief Minister thanks Prime Minister Narendra Modi



२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हा निर्णय ग्रामीण विकास विभागाच्या उच्चाधिकार समितीत घेण्यात आला. केंद्र सरकारचे ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेत ही बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या महत्वपूर्ण निर्णयाचा महाराष्ट्राला फार मोठा लाभ मिळणार आहे. यातून ग्रामीण भागात अनेक रोजगार संधी निर्माण होणार असून, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या कामांना सुद्धा बळकटी येईल. विशेषत: मजुरांची संख्या वाढणार असल्याने अकुशल कामगारांना त्याचा मोठा लाभ होईल. त्यामुळे या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचे आभार मानले आहेत.

Maharashtra’s labor budget increased from 1300 lakh man-days to 1600 man-days; Chief Minister thanks Prime Minister Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात