प्रशांत दामलेंच्या नाट्य सेवेच्या ऐतिहासिक टप्पा, 13,333 प्रयोग; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 13,33,333 रुपयांचे योगदान!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुप्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी त्यांच्या नाटकाचा 13,333 वा प्रयोग करून कारकीर्दीचा ऐतिहासिक टप्पा गाठला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची प्रेरणा घेत, आयुष्याच्या या उल्लेखनीय यशानिमित्त प्रशांत दामले यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹13,33,333 चे योगदान केले.

हा देणगीचा धनादेश मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुपूर्द करण्यात आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामले यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अभिनंदन केले.

– यशवंतराव चव्हाण गौरव समिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ‘यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी गौरव समिती’च्या वतीने प्रदीप कदम यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹15,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला.

– प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने डॉ. गजानन एकबोटे, डॉ. निवेदिता एकबोटे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये ₹30,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. या सगळ्या देणगीदारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

Contribution of Rs. 13,33,333 to the Chief Minister’s Relief Fund!! Prashant Damle

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात