Sabarkantha : गुजरातच्या साबरकांठात हिंसा, 10 जखमी; अनेक घरांची तोडफोड, ३० वाहने जाळली; पोलिसांनी 20 आरोपींना ताब्यात घेतले

Sabarkantha

वृत्तसंस्था

साबरकांठा : Sabarkantha  गुजरातमधील साबरकांठा येथील माजरा गावात शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात सुमारे १० जण जखमी झाले. तीस वाहने जाळण्यात आली आणि अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना ताब्यात घेतले आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.Sabarkantha

शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ध्वज संचलनही केले

साबरकांठा डीएसपी अतुल पटेल म्हणाले, “माजरा गावात रात्री १०:३० वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली. सुमारे ११० ते १२० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हिंसाचार जुन्या वैमनस्यातून झाल्याचे मानले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे.”Sabarkantha



धार्मिक समारंभावरून वाद

पोलिसांनी सांगितले की, गावात एका धार्मिक कार्यक्रमावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. किरकोळ वाद दगडफेक आणि हिंसाचारात रूपांतरित झाला. दंगलखोरांनी गावातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि अनेक वाहने पेटवून दिली.

अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली. हिंसाचारात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हिंसक घटनेची तीव्रता लक्षात घेता, जिल्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी तोडफोड आणि हिंसाचारात सहभागी असलेल्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांची अटक केली जात आहे.

Two Groups Clash in Sabarkantha’s Majra Village: 10 Injured, 30 Vehicles Burnt, Houses Vandalized; Police Detain 20 Accused

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात