उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षकाने हाणला ठोका!!

Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षक आणि हाणला ठोका!!, हा प्रकार राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेत घडला. राहुल गांधींनी विश्वनाथ प्रताप सिंग यांची कॉपी मारून बिहारमध्ये मोटरसायकल वरून मतदार अधिकार यात्रा काढली. यावेळी त्यांच्या समवेत तेजस्वी यादव देखील दुसऱ्या मोटरसायकलवर बसून त्या यात्रेत सामील झाले होते.An enthusiastic young man greeted Rahul Gandhi

राहुल गांधींची ही यात्रा अररियाच्या दिशेने जात असताना एक उत्साही तरुण त्या यात्रेत मध्येच घुसला. तो राहुल गांधीं जवळ पोहोचला त्याने राहुल गांधींना मिठी मारून त्यांचा मुका घेतला. पण हे पाहताच दुसऱ्या मोटरसायकल वर बसलेला सुरक्षारक्षक धावला आणि त्याने त्या तरुणाला ठोका हाणला. राहुल गांधींच्या मतदार अधिकारी यात्रेत सुरक्षेची फार मोठी चूक घडल्याची बातमी प्रसार माध्यमांनी दिली.



राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हेल्मेट घालून मोटरसायकलवर बसले होते. दोघेही एक विशिष्ट अंतर राखून बरोबर चालले होते. अररिया गावाच्या दिशेने जाताना राहुल गांधींच्या मोटरसायकलचा कमी झाल्याचे पाहताच एक तरुण मोटरसायकलींच्या ताफ्यात घुसला. तो थेट राहुल गांधींपाशी पोहोचला. त्याने राहुल गांधींना मिठी मारली आणि त्यांच्या गालाचा मुका घेतला. हे पाहताच दुसऱ्या मोटरसायकलवर मागे बसलेल्या सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून त्या तरुणाला ठोका हाणला. हे सगळे क्षणार्धात घडले. पण राहुल गांधींच्या यात्रेत सुरक्षेची गंभीर चूक झाल्याची बातमी प्रसार माध्यमांनी दिली. परंतु नंतर यात्रा सुरक्षितपणे पुढे गेली.

An enthusiastic young man greeted Rahul Gandhi; the security guard slapped him!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात