विशेष प्रतिनिधी
पुणे : Laxman Hake दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करत असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला आहे. तसेच लक्ष्मण हाके यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू, असेही त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. लक्ष्मण हाके यांच्यावर प्रतिक्रिया देताना सुरज चव्हाण यांची जीभ घसरल्याचे चित्र दिसून आले.Laxman Hake
लक्ष्मण हाके ( Laxman Hake ) यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर सुरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, लक्ष्मण हाके जाणीपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांच्यावर बोलण्याची लक्ष्मण हाके यांची लायकी नाही. तुम्हाला योग्य जागा दाखवण्याची आमची जबाबदारी असल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. Laxman Hake
पुढे बोलताना सुरज चव्हाण म्हणाले, लक्ष्मण हाकेंना माझं खुलं आव्हान आहे की, पुढच्या 10 दिवसात त्यांनी महाराष्ट्रात खुलं फिरुन दाखवावं असे सुरज चव्हाण म्हणाले. हाकेला जशाच तसं उत्तर देऊ. भटक्या कुत्र्याचा कसा उपचार करायचा याची माहिती आम्हाला आहे. प्रसिद्धीसाठी बोलणाऱ्या भटक्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.
काय म्हणाले होते लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री देखील आहेत. अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, असा लक्ष्मण हाके यांचा आरोप आहे. याउलट मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि सारथी संस्थेला पैसे दिले जातात. पण महाज्योती संस्थेला पैसे दिले जात नाहीत. तसेच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, असा आरोप लक्ष्मण हाके आणि त्यांच्या समर्थकांचा आहे. लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या समर्थक आणि काही विद्यार्थ्यांसह गिरगाव चौपाटी परिसरात जलसमाधी आंदोलन केलं. लक्ष्मण हाके भर समुद्रात खोलवर गेले. तिथे त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App