नाशिक : प्रगत देशांची संघटना G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा झाला. काँग्रेस सकट सगळ्या विरोधी पक्षांनी कारण नसताना मोदी सरकारवर आगपाखड करून घेतली. उतावळ्या राजकीय विश्लेषकांनी G7 गटाच्या अतिमहत्त्वापासून ते बिगर महत्वाच्या मुद्द्यांपर्यंत विश्लेषणाचा रतीब घातला. त्याचे शेकडो व्हिडिओ व्हायरल केले, पण एवढे सगळे झाल्यावर सगळे मुसळ केरात गेले. कारण कॅनडाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि G7 गटाच्या बैठकीचे निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदींनी ते निमंत्रण स्वीकारले असून या महिन्याच्या अखेरीस ते G7 च्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कॅनडाला जाणार आहेत. स्वतः पंतप्रधान मोदींनीच ट्विट करून हा दौरा कन्फर्म केला.
G7 प्रगत देशांच्या गटाच्या बैठकीचे यजमानपद यंदा कॅनडाकडे आहे. या बैठकीला अन्य कुठल्या देशांना निमंत्रण द्यायचे असते, ते ठरविण्याचा अधिकार यजमान देशाला असतो. कॅनडाने आतापर्यंत त्यांची guest list जाहीरच केली नव्हती. खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांचे संबंध ताणले गेले असताना कॅनडा भारताला G 7 च्या बैठकीचे निमंत्रण देणार नाही, अशी अटकळ विरोधी पक्षांनी आणि राजकीय विश्लेषकांनी बांधली होती.
त्यामुळे G7 च्या बैठकीच्या निमंत्रणावरून भारतात मोद विरोधक आणि मोदी समर्थक यांच्यात मोठे घमासन माजले होते. काँग्रेसच्या उथळ प्रवक्त्यांनी मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण कसे फसले आहे याचे वर्णन करण्यासाठी G7 च्या न आलेल्या निमंत्रणाचे निमित्त साधले होते. पंतप्रधान मोदी 2019 पासून आतापर्यंत G7 जी सहा बैठकांना उपस्थित राहिले होते. त्याआधी पंतप्रधान मनमोहन सिंग त्या बैठकांना उपस्थित राहिले होते, पण यंदा पंतप्रधान मोदी तिथे उपस्थित राहू शकणार नाहीत. कारण कॅनडाने त्यांना निमंत्रण दिले नाही, असा दावा मोदी विरोधकांनी केला होता.
त्यावर मोदींच्या समर्थकांनी मूळात आता G7 हा गट फारसा politically relevant राहिलेलाच नाही. त्यामुळे त्याचे निमंत्रण आले काय आणि न आले काय मोदींना काही फरक पडत नाही, असा दावा केला होता. त्यासाठी मोदी समर्थकांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या एका वक्तव्याची साक्ष काढली होती. 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी G7 वर टीका करताना तो relevant राहिला नसल्याचा दावा केला होता. G7 गटात अन्य देशांचा त्यात समावेश करून तो गट वाढवावा, अशी सूचना केली होती. ट्रम्प यांच्या त्या सूचनेची आठवण मोदी समर्थकांनी करून दिली होती. G7 गटातून मधून रशिया बाहेर पडल्यानंतर त्याचे महत्त्व संपुष्टात आले, असा “जावईशोध” मोदी समर्थकांनी लावला होता. G7 च्या निमंत्रणाच्या वरून मोदींना ठोकायचे आणि काहीही करून मोदींचे समर्थन करायचे असला प्रकार भारतात सुरू होता.
पण आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. त्यांना G7 गटाच्या बैठकीचे निमंत्रण दिले. कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान कार्नींचे अभिनंदन केले. G7 चे निमंत्रण दिल्याबद्दल मोदींनी त्यांचे औपचारिक आभार मानले आणि आपली उपस्थिती कन्फर्म केली. त्यामुळे मोदी विरोधक आणि मोदी समर्थक या दोघांचेही मुसळ एका झटक्यात केरात गेले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App