राजकीय गोंधळानंतर स्थापन झालेल्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
विशेष प्रतिनिधी
ढाका : Sheikh Mujibur Rahman बांगलादेशमधील आर्थिक आणि राजकीय उलथापालथी दरम्यान, आज (१ जून २०२५) बांगलादेश सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय बांगलादेशातील हिंदूसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.Sheikh Mujibur Rahman
कारण, आजपासून बांगलादेशच्या चलनात एक मोठा बदल दिसून येणा आहे. कारण, नवीन नोटांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचेच छायाचित्र त्यावर नसणार आहे. तर त्या ऐवजी हिंदू मंदिरांसह अन्य महत्त्वांच्या ठिकाणांचे छायित्र असणार आहे. अलिकडच्या काही महिन्यांत देशात झालेल्या राजकीय गोंधळानंतर स्थापन झालेल्या बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
बांगलादेशच्या नवीन नोटांमध्ये कोणत्याही मानवी व्यक्तिरेखेचे चित्रण नाही. देशातील चलनी नोटांवर शेख मुजीबुर रहमान किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे चित्र नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी नोटांमध्ये नैसर्गिक दृश्ये, ऐतिहासिक स्मारके आणि सांस्कृतिक प्रतीकांना प्राधान्य देण्यात आले आहे. १,००० टका, ५० टका आणि २० टकाच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा बदल सांस्कृतिक समावेशकता आणि वारशाचा आदर करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आला आहे.
एएफपीच्या वृत्तानुसार, नवीन नोटामध्ये हिंदू आणि बौद्ध मंदिरे, राष्ट्रीय शहीद स्मारक आणि प्रसिद्ध कलाकार जैनुल आबेदीन यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. बांगलादेशची धार्मिक विविधता आणि लोककला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात असल्याचे मानले जाते.
राष्ट्रीय शहीद स्मारकाचे छायाचित्र हे १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्यांना समर्पित आहे. तसेच नोटामध्ये वारसा स्थळे अधोरेखित करून देशाची ऐतिहासिक ओळख जपण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App