विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad pawar ठाकरे आणि काँग्रेस यांच्या भांडणात शरद पवारांनी 3 – 4 जिल्ह्यांमध्ये टाकले “डाव”; बंडखोरीच्या भीतीने त्यांच्याही उमेदवारी यादीचा पत्ताच नाय!!, अशा कोंडीत पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अडकली आहे. त्या उलट भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे या हिंदुत्ववादी पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आघाडी घेऊन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे, पण महाविकास आघाडीचे निवांत बैठका घेणे सुरू आहे.Sharad pawar
उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातला वाद संपायला तयार नाही. नाना नकोत एवढीच भूमिका काँग्रेसने मान्य केली आणि बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरेंकडे पाठवले. परंतु, नंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत नानाच सामील झाले पण तिथे जाहीर करण्यासारखा तोडगा निघालेला दिसला नाही.
दरम्यानच्या काळात शरद पवारांनी पुणे सोलापूर सातारा बीड अशा तीन-चार जिल्ह्यांमध्ये “डाव” टाकून अजितदादांच्या राष्ट्रवादीतले नेते आपल्या पक्षात घेतले. त्यांनी हर्षवर्धन पाटलांसारखे दोन-तीन भाजपचे नेते फोडले, पण प्रत्यक्ष असले “डाव” टाकून देखील पवारांना त्यांच्या पक्षातल्या बंडखोरीची भीती वाटल्याने त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची अजून उमेदवारी यादी जाहीर केली नाही.
पवारांच्या पक्षाची सगळी मदार मनोज जरांगे यांच्यावर अवलंबून आहे. कारण मनोज जरांगे बाकी सगळ्या पक्षांवर विशेषत: भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर खार खाऊन बोलत आहेत, पण शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी बद्दल त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. उलट पवारांचा लाडका मराठा + मुस्लिम फॉर्म्युला पुढे घेऊन जायचा जरांगेंचा इरादा दिसतो आहे. पण जरांगेंच्या भरवशावर राहून देखील पवारांनी अद्याप उमेदवारी यादी जाहीर करायची हिंमत दाखवलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App