Congress नकोत नानाचा हट्ट पुरविला, पण ठाकरे + पवारांना डबल डिजिटमध्ये ढकलून काँग्रेसनेच पहिला नंबर पटकाविला!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Congress महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये नकोत नाना हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हट्ट काँग्रेसने पुरविला, पण जागावाटपात ठाकरे आणि पवारांच्या पक्षांना डबल डिजिटमध्ये ढकलून काँग्रेसनेच पहिला नंबर पटकाविला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काँग्रेस 105 ते 110, ठाकरेंची शिवसेना 90 ते 95 शरद पवारांची राष्ट्रवादी 75 ते 80 या नंबर गेम वर सुटण्याची शक्यता निर्माण झाली. पण त्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना सिल्वर ओक आणि मातोश्रीवर काल चक्कर मारावी लागली. त्यांची शरद पवारांबरोबरची सिल्वर ओक वरची बैठक अर्धा पाऊण तासात उरकली, पण मातोश्रीवर तर त्यांना तब्बल अडीच तास चर्चा करत थांबावे लागले. उद्धव ठाकरेंना पटवावे लागले.

उद्धव ठाकरेंनी नाना पटोले यांना चर्चेतून वगळून काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांना मातोश्रीवर येणे जरूर भाग पाडले, पण काँग्रेसला मागे ढकलून महाविकास आघाडीत पहिला नंबर पटकाविण्यात मात्र त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेस आणि ठाकरेंना मागे सारून पहिला नंबर मिळवणे पवारांना कधी शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी तसे प्रयत्नही केले नाहीत.

म्हणूनच वर उल्लेख केलेल्या आकड्यांमध्ये मोठा फेरफार होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण तसा कोणी प्रयत्न केल्यास महाविकास आघाडी तुटून विखरून जाण्याची शक्यता दाट आहे.

Congress pushed back thackeray and pawar parties to double digit in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात