विशेष प्रतिनिधी
मुंबई : yashomati Thakur महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागा वाटपावरची तणातणी मुख्यमंत्री पदावरून तर सुरू आहे. ज्याचे आमदार जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असल्याने काँग्रेसच्या विदर्भातल्या जागा कमी करण्यासाठी शिवसेनेने विदर्भातल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर दावा सांगून त्या पक्षाचा पक्षाच्या जागा घटविण्याचा डाव टाकला आहे. काँग्रेस नेत्यांनी नेमकेपणाने तो डाव ओळखून शिवसेनेला देखील ताणून धरले आहे. yashomati Thakur
मात्र काँग्रेसच्या विदर्भातल्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेच्या विपरीत सूर लावला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची 5 वर्षे पूर्ण करायला हवी होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांनी यापुढेही मुख्यमंत्री व्हावे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी भूमिका यशोमती ठाकूर यांनी अमरावतीतल्या महाविकास आघाडीच्या युवक मेळाव्यात जाहीरपणे मांडली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री का व्हायचे नाही??, बाळासाहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले, तर ते तुम्हाला का सहन होत नाही??, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी भाजपला केला. पण या सवालातून त्यांनी काँग्रेस नेत्यांची गोची केली. yashomati Thakur
Modi governments : ‘आरोग्य विमा’धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
वास्तविक काँग्रेसने विदर्भातल्या 62 जागांच्या मुद्द्यावर शिवसेनेला ताणून धरले आहे. शिवसेनेने विदर्भात ताकद नसताना 12 जागा मागितल्या. काँग्रेसने 8 जागा द्यायची तयारी दाखविली. त्यावरून तर महाविकास आघाडीचे जागावाटपाचे गाडे अडले आहे. या वादामध्ये मुख्य मुद्दा जास्तीत जास्त आमदार निवडून आणून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्याचाच आहे. विदर्भातल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर सेंधमारी करून शिवसेनेला तिथे काँग्रेसच्या जागा घटवायच्या आहेत. म्हणून तर काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला ताणून धरले आहे, पण त्याच विदर्भातल्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदासाठी वैयक्तिक का होईना, पण कौल दिल्याने काँग्रेस नेत्यांचीच त्यांनी अडचण करून टाकली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App