प्रतिनिधी
सातारा : Jawan Amar Pawar छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी चकमकीत खंडाळा तालुक्यातील बावडा येथील जवान अमर शामराव पवार (वय ३६) हे शहीद झाले असून, खंडाळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.Jawan Amar Pawar
खंडाळा तालुक्यातील बावडा येथील शेतकरी कुटुंबातील अमर पवार हे छत्तीसगडमधील नारायणपूर कॅम्पमध्ये असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होऊन चार जवान जखमी झाले. यामधील दोनजण गंभीर जखमी असून, त्यामध्ये बावड्यातील अमर पवार यांचा समावेश आहे. जखमी जवानांना सैन्य दलाने कस्तुरमीटा कॅम्पमधून हेलिकॉप्टरच्या साह्याने उपचारासाठी दाखल केले. मात्र येथे उपचारादरम्यान अमर पवार यांना वीरमरण आले. याबाबत खंडाळा तालुक्यात माहिती समजतात संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली.
अमर पवार यांचे प्राथमिक शिक्षण बावडा येथे झाले. त्यांचा मोठा मित्र परिवार बावडा येथे आहे. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणारा अमर सर्वांचा लाडका होता. त्यांच्या निधनाने बावडासह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, सात वर्षांचा मुलगा, भाऊ, भाऊजी असा परिवार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App