विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी केले विशेष आवाहन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांवर व्होट जिहाद केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधक मोठ्या प्रमाणावर व्होट जिहाद करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील मतदारांनी हे षडयंत्र समजून घेऊन ते उद्ध्वस्त करावे
राज्यसभा सदस्य त्रिवेदी म्हणाले की, महाविकास आघाडी (MVA) राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मुद्द्यावर काहीही बोलणार नाही, कारण त्यामुळे व्होट बँकेला धक्का पोहोचेल. बहराइच घटनेवर विरोधकांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यावर कोणी का बोलत नाही असा सवाल केला. ते म्हणाले की, एकीकडे हे लोक लेबनॉन आणि पॅलेस्टाईनवर हॅशटॅग चालवतात, पण देशातील घटना आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर मौन बाळगतात.
खासदार त्रिवेदी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. या निवडणुकीत भाजप-महायुती समृद्धी, सुरक्षा, समरसता आणि स्वाभिमान हे चार प्रमुख मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात असल्याचे ते म्हणाले. आमचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी एमव्हीए सरकारच्या काळात महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत मागे पडला होता. कर्नाटक आणि गुजरात आघाडीवर होते. आमच्या काळात 2023-24 मध्ये महाराष्ट्रात 1 लाख 25 हजार कोटी रुपये आणि कर्नाटकात केवळ 54 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App