विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 45 आमदार फुटले. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाताना त्यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यानंतर लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या 6 महिन्यांच्या कालावधीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले नेते 10, उरलेले 7 वाटेवर आहेत, पण प्रत्यक्षात पवारांच्या “चाणक्य खेळी” केल्याच्या, “डाव” टाकल्याच्या बातम्या मराठी माध्यमांमधल्या बातम्या मात्र शेकड्यांनी चालविल्या. त्यात नावे तीच – तीच आली, कारण दुसरी नावेच उपलब्ध नव्हती.
पवारांच्या पक्षात अजितदादांच्या राष्ट्रवादीतून दिग्गज नेत्यांनी प्रवेश केल्याच्या बातम्यांचे मराठी माध्यमांमध्ये पेव फुटले. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच त्याला आणखीन बहर आला.
Baba Siddiqui बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचणं सुरू झाला होता!
शरद पवार गटाच्या दिशेला कोण??
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, दौंडचे रमेश थोरात, पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, सांगलीच्या खानापूरचे माजी आमदार सदाशिव पाटील या 7 नेत्यांचीही प्रवेशाची चर्चा आहे, तर आतापर्यंत अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण, खासदार धैर्यशील मोहिते, खासदार निलेश लंके, बाबाजानी दुर्रानी, भाग्यश्री आत्राम, भाजपचे हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, तुमसरमधील भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, सूर्यकांता पाटील, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर या 10 नेत्यांनी महायुतीची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पण प्रत्यक्षात मराठी माध्यमांनी पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाच्या बातम्या शेकड्यांनी दिल्यामुळे जणू काही अजित पवारांची अख्खी राष्ट्रवादी खाली झाली. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठमोठे धक्के बसले, असे परसेप्शन त्यातून तयार केले गेले. ते राजकीय वस्तुस्थितीशी पूर्ण विसंगत ठरले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App