भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि या अभियानाचे समन्वयक सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय सदस्यत्व घेतले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे पहिले सक्रिय सदस्य बनले आणि त्यांनी पक्षाची सक्रिय सदस्यत्व मोहीमही सुरू केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि या अभियानाचे समन्वयक सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय सदस्यत्व घेतले.
खुद्द पंतप्रधान मोदींनी X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, सक्रीय सदस्यत्व अभियानातून सक्रिय कार्यकर्ते घडवण्याचा अनोखा उपक्रम! मला खूप अभिमान आहे की आज एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मी भाजप 4 इंडियाचा पहिला सक्रिय सदस्य झालो आणि या अभियानाची सुरुवात केली. सक्रिय सदस्यत्व अभियानामुळे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना देशासाठी काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल. सक्रिय सदस्य बनूनच विभागीय, जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर सेवा करण्याची संधी मिळेल.
Baba Siddiqui बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचणं सुरू झाला होता!
ते म्हणाले, मी देशभरातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की भाजपचे सक्रिय सदस्य व्हा आणि या अभियानाला बळ द्या. विशेष म्हणजे पक्षाचा सक्रिय सदस्य होण्यासाठी एका कार्यकर्त्याला बूथ किंवा विधानसभा जागेवर 50 सदस्यांची नोंदणी करावी लागते. पक्ष दर सहा वर्षांनी भाजप सदस्यत्व मोहीम राबवते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App