Naib Singh Saini : नायब सिंह सैनी आज घेणार हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Naib Singh Saini

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार Naib Singh Saini 

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली: नायब सिंग सैनी आज हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे उच्चपदस्थ नेते आणि इतर उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सैनी यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेतली आणि पंचकुला येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर पुढील सरकार स्थापनेचा दावा केला.

पंचकुलामध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने 90 सदस्यांच्या विधानसभेत 48 जागा जिंकून राज्यात ऐतिहासिक तिसरी टर्म मिळवली. तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या.

हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार स्थापन झाल्याने सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की या मोठ्या कार्यक्रमात सुमारे 50,000 लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

हरियाणात भाजपच्या विजयात ओबीसी मतदारांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते. सीएम सैनी यांच्यामुळे ओबीसी मतदार पुन्हा एकदा भाजपकडे वळल्याचे मानले जात आहे. नायबसिंग सैनी यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात मनोहर लाल खट्टर यांची कमी मैत्रीपूर्ण प्रतिमा सुधारली. सैनी यांनी आपल्या घराची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली होती. त्यांनी जनतेला त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचवण्यास सांगितले होते. त्यांचीही सोडवणूकही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली.

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी विधानसभा निवडणुकीत 16054 मतांनी विजय मिळवला आहे. लाडवा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. सीएम सैनी यांनी काँग्रेसचे उमेदवार मेवा सिंग यांचा दारूण पराभव केला होता. लाडवा येथे सैनी व्होट बँक चांगली आहे. कदाचित त्यामुळेच भाजपने या जागेवरून सैनी यांच्यावर शिक्कामोर्तब केला असावा.

Naib Singh Saini will take oath as Chief Minister of Haryana today

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात