विशेष प्रतिनिधी
मुंबई : Yamini Jadhav : हिंदुत्व सोडले म्हणून उद्धव ठाकरेंना ठोकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांनी भायखळ्यामध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. मोठ-मोठी पोस्टर्स लावून त्यांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे सगळ्या विरोधकांना शिंदे सेनेवर आणि भाजप वर तोंडसुख घेण्याची संधी मिळाली. भाजपच्या नेत्यांनी देखील बुरखा वाटप कार्यक्रमावर संताप व्यक्त केला. एवढे होऊन देखील यामिनी जाधव यांनी बुरखा वाटपाचे समर्थन केले. Yamini Jadhav Burkha distribution
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. तो अपमान उद्धव ठाकरेंनी सहन केला, वगैरे आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडून बहुसंख्य आमदार आपल्याबरोबर घेऊन भाजपकडून मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले. सातत्याने त्यांनी उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना वारंवार ठोकून काढले. उद्धव ठाकरेंचे खासदार मुस्लिम मतांवर निवडून आले, असा सातत्याने आरोप केला.
DCGI : चष्म्याशिवाय वाचण्यास मदत करणाऱ्या आयड्रॉपवर बंदी; प्रिस्क्रिप्शनसह विक्रीस होती परवानगी; कंपनीने चुकीचा प्रचार केला
मात्र त्याच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांनी भायखळ्यामध्ये मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यामिनी जाधव यांना एकनाथ शिंदेंनी लोकसभेची उमेदवारी दिली होती, पण निवडणुकीत त्या पाडल्या. आता विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने त्यांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आम्हाला असला बुरखा वाटपाचा कार्यक्रम पसंत नाही, अशा शब्दांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपने आपली राजवट असलेल्या राज्यांमध्ये हिजाब बंदी कायदे अस्तित्वात आणले. हिजाब विरोधात देशभर वातावरण निर्मिती केली, याकडे अशी शेलार यांनी लक्ष वेधले. Yamini Jadhav
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर देखील यामिनी जाधव यांनी बुरखा वाटपाचे समर्थन केले. वेगवेगळ्या समाज घटकांना वेगवेगळ्या सणांच्या वेळी आम्ही भेटवस्तू देत असतो. माझा मतदारसंघ कॉस्मोपोलिटीन आहे. त्यामुळे आम्ही वर्षभर विचार करूनच मुस्लिम महिलांना सर्वाधिक प्रिय असलेल्या बुरखा वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतला, असे स्पष्टीकरण यामिनी जाधव यांनी दिले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App