विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले म्हणून उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी ठोकले, पण खुद्द त्यांच्या शिंदे सेनेचे हिंदुत्व आता बुरखे वाटपावर आले!!
– याची कहाणी अशी :
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करताना जी कारणे दिली होती, त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे आणि सावरकरांचे हिंदुत्व सोडले. सावरकरांचा काँग्रेसने अपमान केला, तो उद्धव ठाकरेंनी सहन केला. अजित पवारांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय केला, यांचा समावेश होता. त्यानंतर देखील अनेकदा एकनाथ शिंदेंनी वारंवार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सटकवले होते.
पण हिंदुत्व सोडले म्हणून उद्धव ठाकरेंना ठोकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र त्यांचे हिंदुत्व बुरखे वाटपावर आणून ठेवले.
हायकोर्टाने 4 दहशतवाद्यांची फाशी जन्मठेपेत बदलली; पाटण्यात मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवला होता
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या यामिनी जाधव यांनी भायखळ्यात मुस्लिम महिलांसाठी बुरखे वाटपाचा कार्यक्रम घेतला. त्याचे मोठमोठे बॅनर्स लावले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची मोठी संधी मिळाली. यामिनी जाधव यांना एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती. परंतु, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी यामिनी जाधव यांनी बुरखे वाटपाचा कार्यक्रम घेतला. परंतु, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अडचणीत आली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी देखील बुरखे वाटपाचा कार्यक्रम आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांमध्ये यामिनी जाधव यांच्या कार्यक्रमाचे वाभाडे काढले.
एकीकडे शिक्षण संस्था, सार्वजनिक संस्था यांच्यात हिजाब बंदीसाठी भाजप एक पक्ष म्हणून आग्रही आहे. भाजपच्या सरकारांनी हिजाब बंदीचे कायदे केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने हिजाब बंदीला पाठिंबा दिला आहे. पण त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्याने मुस्लिम महिलांना बुरखे वाटपाचा कार्यक्रम घेऊन शिंदे यांची शिवसेना अडचणीत आणली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more