वृत्तसंस्था
चंदीगड : अनिल मसीह वादाच्या केंद्रस्थानी आहेत. ते चंदीगड महापालिकेत 18 ऑक्टोबर 2022 रोजी निवडलेल्या 9 स्वीकृत नगरसेवकांपैकी एक आहेत. थेट भाजपशी संबंध असतानाही त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आले. ते भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे महामंत्री आहेत.Chandigarh Municipal Election Controversy, Election Officer Anil Masih is not an official but an accepted corporator
पंजाब इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये राहून खासगी कामे करतात. या अनिल मसीह यांना चंदीगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महापौर निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले होते. निवडणूक 18 जानेवारीला होणार होती, मात्र, 17 जानेवारीला मसीह आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.
चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडिओ समोर आला आहे, जो विरोधकांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सादर केला. व्हिडिओमध्ये निवडणूक अधिकारी (आरओ) अनिल मसिह मतपत्रिकेवर टिक केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे पाहत आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड म्हणाले – “बॅलेट पेपरमध्ये छेडछाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे निवडणुका घेतल्या जातात का? या व्यक्तीवर (निवडणूक अधिकारी), या कॅमेऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. हे कॅमेऱ्याकडे का बघत आहेत आणि मग चोरासारखे पळून का जात आहेत?”
सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर मानले. त्यानंतर महापौर निवडणुकीचे सर्व रेकॉर्ड हायकोर्टात सादर करण्यात आले. पालिकेच्या बैठकांवर बंदी घालताना SC म्हणाले की, गरज पडल्यास आम्ही पुन्हा निवडणुका घेऊ शकतो.
निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांना वैयक्तिकरित्या उत्तर देण्यासाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारीला होणार आहे.
चंदीगड महापालिकेत महापौर निवडणुकीसाठी 36 मते पडली. ज्यामध्ये 35 नगरसेवक आणि 1 खासदार यांची मते वैध आहेत. येथे दरवर्षी नवीन महापौर निवडला जातो. या निवडणुकीत भाजपकडे 14 नगरसेवक आणि एका भाजप खासदार किरण खेर यांच्या मतांसह 15 मते होती. आम आदमी पक्षाला 12 तर काँग्रेसकडे 8 मते होती. एक मत शिरोमणी अकाली दलाचे (बादल) होते.
ही पहिलीच निवडणूक होती ज्यात AAP आणि काँग्रेस INDIA आघाडी अंतर्गत एकत्र लढत होते. या अर्थाने आप-काँग्रेसची 20 मते त्यांच्या बाजूने होती. निवडणुकीच्या दिवशी निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी मतमोजणीच्या वेळी भाजपची मते 16 असल्याचे घोषित केले. ज्यामध्ये त्यांच्याकडे 14 नगरसेवक, एक खासदार आणि एका एसएडी नगरसेवकाची मते होती. आप आणि काँग्रेसची 12 मते जाहीर झाली तर 8 मते अवैध ठरली. ही सर्व अवैध मते आप-काँग्रेसच्या नगरसेवकांची होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App