NCP : निवडणूक आयोगाच्या निकालावर पवारांची “ताजी” प्रतिक्रिया नाही; थकणारही नाही, थांबणारही नाही, हा जुनाच व्हिडिओ व्हायरल!!

I will not tire or stop until I have your support sharad pawar old video viral

विशेष प्रतिनिधी

मुंबई : NCP राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांची पक्षाचे घड्याळ चिन्हही अजित पवारांकडे दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्यानंतर शरद पवारांची कोणतीही ताजी प्रतिक्रिया आलेली नाही, त्याउलट शरद पवार गटाने त्यांचा 2022 चा मी म्हातारा झालो नाही. तुमचा पाठिंबा असेपर्यंत मी थकणार नाही आणि थांबणार ही नाही, असे वक्तव्य केलेला जुनाच व्हिडिओ व्हायरल केला आहे.  I will not tire or stop until I have your support sharad pawar old video viral

निवडणूक आयोगाच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा झाल्या आणि त्यांनी एकमेकांवर टीका केली. अजित पवारांनी शरद पवारांची राजकीय हत्या केली असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला “ध” चा “मा” करणाऱ्यांवर मी बोलत नसतो, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी दिले.

पण निवडणूक आयोगाच्या एवढ्या महत्त्वाच्या निर्णयावर स्वतः शरद पवारांनी पुढे येऊन कोणतीही ताजी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांचा जुना व्हिडिओ शोधून काढून मी म्हातारा झालो नाही. तुमचा पाठिंबा असेपर्यंत थकणार नाही आणि थांबणारही नाही, असे “ताजे” वक्तव्य केल्याचा आभास निर्माण केला.

– पवार गट कोणते चिन्ह सुचविणार??

शरद पवार गटाला आता 7 फेब्रुवारी 2024 दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्वतःच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह यांचे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सुचवायचे आहेत आणि त्यानंतर निवडणूक आयोग राज्यसभा निवडणुकीपुरता निकाल देऊन शरद पवार गटाला त्यांनी सुचवलेल्यापैकी एक नाव आणि एक चिन्ह बहाल करणार आहे. शरद पवार गटाने कोणतेही नाव अथवा चिन्ह उद्या दुपारपर्यंत सुचवले नाही, तर ते आणि त्यांचा पक्ष किंवा गट राज्यसभा निवडणुकीत “अपक्ष” गणले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या गटातल्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवारांच्या व्हिपच्या विरोधात मतदान केले, तर त्यांची आमदारकी धोक्यात येणार आहे.

I will not tire or stop until I have your support sharad pawar old video viral

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात