कोमेजून निजलेली एक सुप्री राणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही परी आज नाही गेले हातातून घड्याळ झाली संतापाने लाहीलाही सांगायाची आहे माझ्या लाडक्या ताईला दमलेल्या काकाची ही कहाणी तुला
ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)
आट-पाट नगरात निवडणुका होती भारी पाच पाच वर्षापाठी नव्या सत्तेची तयारी प्रत्येकच वेळी काका हमखास बोले पंतप्रधान व्हायचे स्वप्न यंदा विरूनच गेले जमलेच नाही कधी जमाखर्च राष्ट्रीय कीर्तीचे साडे-तीन जिल्ह्यांचे उरले राजकारण जातीचे पुढच्या वेळी मी होणार नेता संपूर्ण देशाचा काका म्हणे तेव्हा दादा तुला सातबारा हा पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची परी करीन मी सुप्रीला
सांगायाची आहे माझ्या लाडक्या ताईला दमलेल्या काकाची ही कहाणी तुला
उपमुख्यमंत्री पदासाठी दादा करी लटपटी किती घेतल्या शपथा भल्या पहाटे पहाटे किती केली काकासेवा सदा राहून पाठी पाठी तरी सदा दुय्यम राहिला, वाट पहात नित्याची शेवटी करून हिम्मत सोडले काकोबाचे पाय केला ‘देवा’चा धावा, पक्ष फोडणे हाच उपाय दादा गेला सोडून तोडून, नाद हा खुळा काका म्हणे हात नको लावू रे घड्याळा
दिस-मास-वर्षे गेली खाल मानेने निघून एक-एक दिवा आशेचा गेला हळूच विझून अशावेळी काय सांगू काय काय वाटे सांडले आयुष्य हातातून, मनी वैफल्य ते दाटे किती केल्या तडजोडी, किती घोटाळे भीषण शेवटी हाती लागे काय तर निराशा विषण्ण झालो नाही कधी पंतप्रधान सदा उरलो दुय्यम तुझ्याकडे पाहून परी पोरी राखला संयम
करायचे होते राणी मुख्यमंत्री ग तुला गेला दादा, गेले चिन्ह उरे फक्त खुळखुळा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App