वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच भारतीय धर्माच्या शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात ते लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंदू, जैन, शीख व बौद्ध धर्माचे शिक्षण चौथीपासून दिले जाईल. ब्रिटनमध्ये धार्मिक शिक्षण दहावीपर्यंत सक्तीचे आहे. सध्या ख्रिश्चन धर्माचे शिक्षणच दिले जाते.the teaching of Indian religions in British schools; From April 4th to 10th study starts
आता ब्रिटनच्या शाळांमध्ये शिकणारे ८८ लाख गोरे व इतर वंशीय विद्यार्थी व भारतीय वंशाचे सुमारे ८२ हजार विद्यार्थ्यांना भारतीय धर्मांचे शिक्षण उपलब्ध होईल. सरकारने भारतीय धार्मिक शिक्षणासाठी पहिला हप्ता दिला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सने निधीला मंजुरी दिली आहे. यातून शिक्षणांना प्रशिक्षण दिले जाईल. सरकारने भारतीय धार्मिक शिक्षणासाठी पुस्तकांची ऑर्डर दिली आहे.
भारतीय पालकांनी सर्व्हेत योग, आयुर्वेद, संस्कार शिक्षण, ध्यान व वैदिक गणितही ब्रिटनच्या शाळांमध्ये शिकवण्याची मागणी केली आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत विश्व हिंदू परिषद यूके व वैदिक शिक्षण संघटना (वॉयस) सारख्या संघटना भारतीय कुटुंबातील मुलांसाठी धार्मिक शिक्षणाचा व्यावसायिक कोर्स शिकवतात. दहा वर्षीय विद्यार्थ्याची आई रमा द्विवेदीने भास्करला सांगितले की, या निर्णयामुळे भारतीय समुदाय खुश आहे. आता भारतवंशीय मुलांना शाळेत धर्माचे शिक्षण मिळेल. ब्रिटनमधील भारतीय कुटुंबे व इतर संघटनांची खूप वर्षांपाूसन धार्मिक शिक्षणाची मागणी होती.
इनसाइट यूके नावाच्या संघटनेच्या सर्वेनुसार ब्रिटनच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक दहा भारतीय विद्यार्थ्यांपैकी पाचवर धर्माच्या नावाने गुंडगिरी होते. भारतीय मुलांसोबत शिकणाऱ्या ब्रिटिश मुलांना भारतीय धर्मांबाबत माहिती नसते. त्यांच्यात भारतीय धर्मांबाबत गैरसमज आहेत. यामुळे भारतीय मुलांचा छळ होतो. आता भारतीय धर्मांच्या शिक्षणाचा समावेश झाल्याने इतर समुदायाच्या मुलांनाही भारतीय धर्मांबाबत माहिती होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App