पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दूल रज्जाकचे ऐश्वर्या राय बद्दल आक्षेपार्ह विधान, म्हणाला…

रज्जाकने हे विधान केले तेव्हा त्याच्यासोबत पाकिस्तानचे काही माजी खेळाडूही होते.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात होत असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने पाकिस्तानी क्रिकेट संघ अस्वस्थ झाला आहे. कारण पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबाबत लाजीरवाणं विधान केल्याचे समोर आले आहे.Former Pakistan cricketer Abdul Razzaks offensive statement about Aishwarya Roy

आता अब्दुल रज्जाकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि क्रिकेटप्रेमी त्याला या कृतीसाठी प्रचंड ट्रोल करताना दिसत आहेत. जाणून घ्या अब्दुल रज्जाकने ऐश्वर्या रायबद्दल असे काय म्हटले आहे?



पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अब्दुल रज्जाक, उमर गुल आणि शाहिद आफ्रिदी हे नुकतेच एका शोदरम्यान पोहोचले होते. यादरम्यान अब्दुल रज्जाक इराद्यांबद्दल बोलत होता, तेव्हा त्याने ऐश्वर्या रायबद्दल टिप्पणी केली. ‘संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी इरादे योग्य असले पाहिजेत. मी येथे त्यांच्या (पीसीबी) हेतूबद्दल बोलत आहे, जेव्हा मी खेळत होतो तेव्हा मला माहीत होते की माझा कर्णधार युनूस खानचा हेतू चांगला आहे. मी त्याच्याकडून आत्मविश्वास आणि धैर्य घेतले आणि अल्लाहचे आभार मानतो की मी पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगली कामगिरी करू शकलो.

इथपर्यंत अब्दुल रज्जाक यांचे म्हणणे बरोबर होते, पण पुढे त्याने आपल्या वक्तव्यात ऐश्वर्याचे नावही घेतले. तो म्हणाला, ‘जर तुम्हाला वाटत असेल की मी ऐश्वर्या रायशी लग्न करेन आणि मग मला चांगली आणि सद्गुणी मुलं होतील, तर असं कधीच होऊ शकत नाही, तर आधी तुम्हाला तुमचा हेतू सुधारावा लागेल.’

अब्दुल रज्जाकचे हे वक्तव्य ऐकून तेथे उपस्थित शाहिद आफ्रिदी आणि उमर गुल हसू लागले आणि टाळ्या वाजवू लागले. आता पाकिस्तानच्या या तीन क्रिकेटपटूंची कृती पाहून चाहते संतापले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करून चाहते त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.

Former Pakistan cricketer Abdul Razzaks offensive statement about Aishwarya Roy

महत्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात