पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या तब्येतीत सुधारणा; मेहता रूग्णालयाचे मेडिकल बुलेटिन जारी

वृत्तसंस्था

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना अहमदाबाद येथील यू. एन. मेहता रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. त्यांना रूटीन चेकअपसाठी मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये नेण्यात आले होते. आज गुरूवारी या सेंटरने मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट दिली आहे. PM Modi’s mother’s health improved; Mehta Hospital Medical Bulletin released

हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दलची अपडेट यू एन मेहता रूग्णालय व्यवस्थापनाने मेडिकल बुलेटिन जारी करून दिली असून त्यामध्ये हिराबेन मोदी यांची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे.



गेल्या १८ जून रोजी हिराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती जी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, तर गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये मोदींनी त्यांच्या आईची भेट घेतली होती.

PM Modi’s mother’s health improved; Mehta Hospital Medical Bulletin released

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात