पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली.Pune: Mayor Muralidhar Mohol infected with corona; Tweeting information
विशेष प्रतिनिधी
पुणे : दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे.सध्या पुणे शहरात 44 हजार 452रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 209 झाली आहे.अशातच शहरातील पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.त्यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली.दरम्यान टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मोहोळ यांनी ट्विट करून दिली आहे.
कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल. आपला,मुरलीधर मोहोळ, महापौर — Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) January 27, 2022
कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी. आपल्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेल.
आपला,मुरलीधर मोहोळ, महापौर
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) January 27, 2022
महापौर म्हणाले की , ” कोरोनाची काहीशी लक्षणे जाणवल्यावर RT-PCR चाचणी केली असता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून संपर्कात आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन घ्यावी.तसेच आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांच्या पाठबळावर लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत असेन.”अशी माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App