राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. EighMiraj Government Scientific College contracted coronat students of
विशेष प्रतिनिधी
सांगली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ ब-याच दिवसांपासून मंदावली असताना, पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दरम्यान, राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. जानेवारीत रुग्ण संख्या वाढण्याचे संकेत टास्क फोर्सने दिले आहेत.अशातच MBBS च्या आठ विद्यार्थीनींना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिरज शासकिय वैज्ञकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थीनिंना कोरोनाची लागण झाली आहे.पोझिटिव्ह आढळलेल्या विद्यार्थिनींना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.यानंतर संपर्कातील विद्यार्थीनींची कोरोना चाचणी घेण्यात आली असून ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.काॅलेज परिसरातील एका कार्यक्रमामुळेच एकाच वेळी सर्वांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App