दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! पेपर सोडवण्यासाठी मिळणार जास्त वेळ

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा हा निर्णय घेतला आहे.Good news for 10th – 12th grade students! There will be more time to solve the paper


विशेष प्रतिनिधी

पुणे : होय!परीक्षेदरम्यान पेपर सोडविण्यासाठी यंदा विद्यार्थ्यांना जास्त वेळ मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तास अधिकचा मिळणार आहे.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा हा निर्णय घेतला आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे.



वेळापत्रकानुसार ८० गुणाच्या पेपरला ३० मिनिटे आणि ४० गुणांच्या पेपरला १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहेत.https://www.mahasscboard.in यावर जारी करण्यात आले आहे.

राज्य शिक्षण मंडळाने आवाहन केले आहे की , विद्यार्थी, शाळा आणि पालकांनी हेच वेळापत्रक प्रमाण मानावे आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही वेळापत्रक आणि माहितीवर विश्वास ठेवू नये. तसेच परीक्षेपूर्वी शाळांकडे छापील वेळापत्रक देण्यात येणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसावे.

Good news for 10th – 12th grade students! There will be more time to solve the paper

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात