
विशेष प्रतिनिधी
इंग्लंड : ऐकावे ते नवलच म्हणतात ते अगदी खरं आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या केट कनिंगघम या स्त्रीने पार्कमधील एका झाडासोबत लग्न केले आहे. 2019 मध्ये तिने या झाडासोबत विवाहसोहळा अगदी धूमधडाक्यात केला होता. त्यानंतर बरेच लोक तिच्या या कृतीवर आश्चर्य व्यक्त करतात आणि काही लोकांना तर आता कळतच नाही की नेमके काय चालू आहे. पण केट मात्र आपल्या संसारात अत्यंत सुखी आहे याSव ती स्वतः सांगते.
A woman marries a tree
आठवड्यातून पाच सहा वेळा ती आपला पती म्हणजे झाडाला भेटायला जाते. दर ख्रिसमसला ती आपल्या पतीला म्हणजे झाडाला सजवते. आणि तिथे जाऊन केक कापते. तिने आपले आडनाव देखील कनिंगघम वरून आता एल्डर असे केले आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे आमंत्रण द्यायचे असेल तर ते मिस्टर अँड मिसेस एल्डर असे ती त्या पोस्टकार्डवर लिहिते.
Marriage In Flying Plane : लॉकडाऊनमुळे विमानच बनलं मंगल कार्यालय, वधु-वरांनी आसमंतात बांधली रेशीमगाठ
आपल्या या लव स्टोरी बद्दल सांगताना म्हणते की, मी पार्कमध्ये फिरायला जायचे. त्यावेळी मला हे झाड अत्यंत आवडले. आणि मी त्या झाडासोबत विवाह करण्याचे ठरवले. आपले संपूर्ण आयुष्य त्या झाडासोबत काढण्याचे ठरवले. आता तुम्हाला वाटेल की ही एक वेडी मुलगी असेल तर ती एक शिक्षिका आहेत. शिक्षिका म्हणून ती मागची बरीच वर्षे इंग्लडमध्ये काम करते.
A woman marries a tree
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ