माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. Gulabrao Patel compares Hema Malini’s cheek to the road; Praveen Darekar demanded to file a case
विशेष प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे.तसेच नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.दरम्यान बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारसभेत शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे.
माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. दरम्यान हेमा मालिनींच्या गालाची तुलना रस्त्याशी केल्याबद्दल गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की , ” माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला.मी हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते केलेत. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, अशी टीका पाटलांनी खडसेंवर केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App