पूर्वी मोठ्या शहरात असणारी ही प्रदर्शने किंवा खरेदी उत्सव आता निमशहरी व ग्रामीण भागातही पोहचू लागले आहेत. येथे प्रामुख्याऩे घरगुती वापराच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते.Don’t be part of a crowd of shoppers in a continuous sale
तसेच त्या वस्तूंवर आकर्षक पद्धतीने सूट दिलेली असल्याची जाहिरात केलेली असते. त्यामुळे या ठिकाणी लोकांची नेहमीच चांगली गर्दी असते. साधारण आठ ते दहा दिवस हे सेल किंवा उत्सव असतात.
त्यामुळे लोक तेथे जातात व हव्या त्या वस्तू विकत घेतात. अशा वेळी खरेदीचा मोह अनेकांना आवरत नाही. तेथे अनेकदा नको असलेल्या अनेक वस्तू विकत घेण्याच मोह आपल्याला होतो. शिवाय अशा ठिकाणी अनेक नव्या व छोट्या छोट्या अनेक वस्तू विकायला ठेवलेल्या असतात.
तेथे तो वस्तु विकणारा फार चांगल्या पद्धतीने ती वस्तू कशी वापता येईल याचे प्रात्यक्षिक करीत असतो. त्यामुळे घरात त्याचा आपल्याला वापर होईल या हेतूनं अनेक जण ती वस्तू खरेदी करतात. अनेकदा त्याचा वापर होण्याची खरे तर सुतराम शक्यता नसते.
पण आपण त्यावेळी विचारच करत नाही. खरेदी करणाऱ्या गर्दीचा आपण एक भाग बनून जातो. त्यामुळे मोठ्या सेलमध्ये वस्तू विकत घेताना ती वस्तू घरात आहे का किंवा त्या प्रकारची तसलीच वस्तू आहे का याचा विचार क्षणभर का होईना करावा. तसेच सध्या सेलमधून ही वस्तू खरेदी करण्याची खरेच गरज आहे का याचाही विचार करावा. त्यामुळे अनेकदा नको असलेल्या वस्तूंची खरेदी थांबते व बऱ्यापेकी पैशांची बचत होण्यास मदत होते.
Don’t be part of a crowd of shoppers in a continuous sale
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App