वृत्तसंस्था
प्रतापगड : उत्तर प्रदेशातून बुल (बैल) आणि बुलडोझर घालविण्यासाठी समाजवादी पक्षाचे सरकार हवे आहे, असा टोला समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारला लगावला आहे. प्रतापगड मध्ये एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. A socialist government is needed to drive bulls and bulldozers out of Uttar Pradesh; Akhilesh Yadav
योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख अखिलेश यादव यांनी “मुख्यमंत्री बाबा” असा केला. मुख्यमंत्री बाबांना लॅपटॉप आणि मोबाईल फोन चालवता येत नाही. त्यामुळे ते तुम्हाला लॅपटॉप तसेच मोबाईल देणार नाहीत. त्यांचे सरकार जुन्या लोकांनी भरलेले आहे असे टीकास्त्र देखील त्यांनी सोडले. समाजवादी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर ते निरपराध असताना त्यांच्यावर खटले दाखल केले जात आहेत.
त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकरणांमध्ये किंवा गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. कारण त्यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकायची आहे परंतु उत्तर प्रदेशाची जनता हे घडू देणार नाही. राज्यातला बुल (बैल) आणि बुलडोझर घालवण्यासाठी समाजवादी पक्षाचे सरकार आणेलच, असा हल्लाबोल देखील अखिलेश यादव यांनी केला आहे.
राज्य सरकारच्या मंत्र्यांना एक प्रकारे त्यांनी बैल असे संबोधून घेतले. उत्तर प्रदेश सरकार अशिक्षित लोकांनी भरले आहे ही प्रतिमा त्यांना राज्याच्या जनतेवर ठसवायची आहे. त्यामुळे ते वारंवार “मुख्यमंत्री बाबा” आणि बुलडोजर या शब्दांचा वापर करुन भाषणे करताना दिसतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App