वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्या दिल्लीत दाखल होणार असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्रिपुरा मधील कथित पोलीस अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.Mamta says, Khela Hobe, we say Vikas Hobe; BJP’s reply
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे खासदारही दिल्लीत धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्रिपुरामध्ये पोलीस अत्याचार करत आहेत. या विरोधी तक्रार करण्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट मागितली आहे. संपूर्ण देशात त्रिपुराचा मुद्दा उपस्थित करण्याचे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
याला भाजपच्या नेत्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांना वाटत असेल आपण कुठेही खेळ करू शकतो. पण असे घडणार नाही. त्या म्हणत असतील खेला होबे तर आम्ही म्हणतो विकास होबे…!! सर्व विरोधकांच्या मिळून ममता बॅनर्जी या जर ट्वेंटी 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असतील तर आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्या रूपाने विकासाचा चेहरा आहे, असे लॉकेट लॉकेट चॅटर्जी म्हणाल्यात.
If Mamata Banerjee will be their (Oppn) face (in 2024 polls), it'll be violence vs ideal personality like PM Modi. Everyone knows what she did in Bengal. It'll be good for us but we know that she comes to Delhi again & again but goes back empty-handed: BJP MP Locket Chatterjee pic.twitter.com/lceYwjCnGE — ANI (@ANI) November 22, 2021
If Mamata Banerjee will be their (Oppn) face (in 2024 polls), it'll be violence vs ideal personality like PM Modi. Everyone knows what she did in Bengal. It'll be good for us but we know that she comes to Delhi again & again but goes back empty-handed: BJP MP Locket Chatterjee pic.twitter.com/lceYwjCnGE
— ANI (@ANI) November 22, 2021
ममता बॅनर्जी या त्रिपुरातील हिंसाचार आणि पोलिसांचे अत्याचार हा मुद्दा पंतप्रधानांच्या भेटीत उपस्थित करणार आहेत. त्याच बरोबर मुंबई, गोवा, लखनऊ या शहरांमध्ये देखील या मुद्द्यावर मी बोलत राहणार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. भाजपला देशात संघराज्य व्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे. आपले वर्चस्व लादायचे आहे. राज्यघटनेने राज्यांना दिलेले अधिकार त्यांना मान्य नाहीत, पण आम्ही आमच्या अधिकारांवर पाणी सोडणार नाही, असे वक्तव्य देखील ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
त्यालाच प्रत्युत्तर देताना खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा खेला होबे म्हणजे देशात हिंसाचार होणे, कार्यकर्त्यांना मारणे, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे असा त्यांचा खेळ आहे. पण आम्ही विकासाचा खेळ करू इच्छितो. आम्ही म्हणतो विकास होबे, असे लॉकेट चटर्जी म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App