विशेष प्रतिनिधी
मेघालय : मेघालयची राजधानी शिलाँग पासून 100 किलोमीटर अंतरावर एक नदी आहे. उमनगोट असे या नदीचे नाव आहे. या नदीचे काही फोटोज नुकताच जलशक्ती मिनिस्ट्रीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. जगातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर नद्यांपैकी एक नदी म्हणजे उम्मनगोट ही नदी आहे.
Have you seen the photos of Umangot river in Meghalaya?
ट्विटरवर ही बातमी शेअर करताना त्यांनी लिहीले आहे, की या नदीतील पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी आहे. हे पाणी इतके पारदर्शी आहे की, नदीच्या तळाशी असलेली दगड देखील स्पष्ट दिसून येत आहेत. या बोटचा फोटो पाहिल्यास असे वाटते की बोट जणू हवेमध्येच रंगत आहे. त्याचप्रमाणे ही नदी स्वच्छ ठेवण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी मेघालयाच्या लोकांचे आभार देखील मानले आहेत. सध्या हा फोटो इंटरनेटवर अतिशय वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे.
Odisha: Water level of Zarow river in Ganjam district is rising due to heavy and incessant rainfall in the region.
औद्योगिकरणामुळे सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे भारतातील जास्तीत जास्त नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. वाढते जलप्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण मेघालयमधील या नदीचे फोटो पाहिल्यास अतिशय सुखद धक्का बसतोय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App