यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनांना मंदी, देशी उत्पादनांची चलती; व्यापारी महासंघाचा पुढाकार आणि जनतेचा प्रतिसाद!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : यंदाची दिवाळी गेल्या अनेक दिवाळीच्या तुलनेत “भारतीय दिवाळी” म्हणून ओळखली जाईल. कारण यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनापेक्षा भारतीय उत्पादनांची चलती मोठ्या प्रमाणावर आहे. This year’s Diwali saw a slump in Chinese products, a shift in domestic production; Trade Federation initiative and public response !!

मातीच्या दिव्यापासून ते सर्व पारंपारिक वस्तूंपर्यंत सुमारे एक लाख कोटी रुपयांचा व्यवहार या दिवाळीत होण्याची अपेक्षा भारतीय व्यापारी महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे.

गेली अनेक वर्षे दिवाळीच्या काळात बाजारात चिनी उत्पादनांची चलती असायची. परंतु यंदा 2021 साली मात्र चिनी उत्पादने मागे पडली असून भारतीय उत्पादनांचा खप वाढला आहे. भारतीय ग्राहक आवर्जून पारंपारिक भारतीय उत्पादने खरेदी करण्याकडे वळले आहेत. पर्सनल लोनमध्ये वाढ झाल्याने बाजारात पैसा उपलब्ध झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून खरेदी-विक्रीच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. दिवाळीत पारंपारिक वस्तूंची खरेदी – विक्री एक लाख कोटींपर्यंत होऊन संपूर्ण वर्षभरात म्हणजे 2021 डिसेंबर पर्यंत भारतीय बाजारात तीन लाख कोटींची खरेदी विक्री झाली असेल, असे अनुमान प्रविण खंडेलवाल यांनी व्यक्त केले आहे.



केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ भारतीय व्यापाऱ्यांना झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. भारतीय ग्राहकांचा कल चिनी उत्पादनांच्या खरेदीपेक्षा भारतीय उत्पादनांकडे अधिक असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी नोंदविले. भारतीय उत्पादनांच्या खरेदी-विक्री मुळे बाजारात येणारा पैसा देखील भारतातच राहून आर्थिक वाढीच्या दरात त्याचे परिवर्तन होईल, असा विश्वास देखील प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केला आहे.

This year’s Diwali saw a slump in Chinese products, a shift in domestic production; Trade Federation initiative and public response !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात