Waqf Board Amendment Act : वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉर्ड बोर्डाचा विरोध; वक्फच्या मालमत्ता मुस्लिमांच्या पूर्वजांनी दान केल्याचा दावा!!


विशेष प्रतिनिधी

लखनौ : सध्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात असलेल्या सगळ्या मालमत्ता मुस्लिमांच्या पूर्वजांनीच दानात वक्फ दिल्या असल्याचा दावा करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रस्तावित वक्फ बोर्ड ( Waqf Board )सुधारणा कायद्याला विरोध केला आहे.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे (एआयएमपीएलबी), सदस्य, मौलाना खालिद रशीद फरंगी महाली मीडिया रिपोर्ट्सवर बोलतात म्हणाले, की केंद्र सरकार मालमत्तांवरील वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश ठेवण्यासाठी विधेयक आणण्याची शक्यता आहे. पण खरंतर आमच्या पूर्वजांनी त्यांच्या मालमत्तेचा मोठा भाग दान केला आहे आणि त्यांनी इस्लामिक कायद्यानुसार तो वक्फ बनवला आहे. म्हणून वक्फ कायद्यानुसार हे महत्त्वाचे आहे की संपत्तीचा वापर केवळ धर्मादाय हेतूंसाठीच केला जावा. एकदा मालमत्ता वक्फ झाली की ती विकली जाऊ शकत नाही किंवा हस्तांतरित करता येत नाही, जोपर्यंत आमच्याकडे वक्फ कायदा 1995 आहे आणि त्यात काही सुधारणा करण्यात आल्या. 2013 आणि सध्या या वक्फ कायद्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही आणि जर सरकारला काही गरज आहे असे वाटत असेल तर सरकारने कोणतीही दुरुस्ती करण्यापूर्वी संबंधितांचा सल्ला घ्यावा आणि त्यांचे मत घ्यावे. प्रत्येकाने लक्षात ठेवावे की सुमारे 60 ते 70 % वक्फ मालमत्ता मशिदी, दर्गा आणि कब्रस्तानच्या रूपात आहेत.



 

60 ते 70 % वक्फ मालमत्ता मशिदी, दर्गा किंवा कब्रस्तानच्या मालकीच्या असल्याचा दावा करून मौलाना खालिद यांनी या मालमत्तांना हात लावणे कठीण असल्याची छुपी दमबाजी केली आहे.

एआयएमआयचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध केला आहे.

Muslim Personal Lord Board’s opposition to Waqf Board Amendment Act

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात