विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतल्या भदरसा येथे समाजवादी पार्टीचा स्थानिक नेता आणि बेकरी मालक मोईद खान अन्सारी आणि त्याचा नोकर राजू खान यांनी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले. ती गरोदर राहिल्यावर सगळे प्रकरण उघडकीस आले. मोईद खान आणि राजू खान यांना अटक झाली. योगी सरकारने मोईद खानच्या बेकरीवर बुलडोझर चालविला. Samajwadi party trying to cover up ayodhya rape case
पण हे सगळे प्रकरण समाजवादी पार्टीच्या अंगलट आल्यावर त्या पक्षाच्या नेत्यांनी पीडित मुलीच्या परिवाराला पैसे देऊन त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार त्या परिवाराने उघड केल्यावर समाजवादी पार्टीचे नेते अडचणीत आले. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर मोठी मागणी केली आहे. पीडित मुलीला उत्तम वैद्यकीय उपचार पुरवा आणि तिच्या सुरक्षेचीही मागणी करत न्यायालयाला विनंती केली.
अखिलेश यादव यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत म्हटलं आहे की बलात्कार पीडितेला सरकारने चांगल्यात चांगले उपचार द्यावेत तसंच तिच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की परिस्थितीची संवेदनशीलता आणि गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने पीडित मुलीची सुरक्षा सुनिश्चित करावी. अशा घटनांचं राजकारण करणाऱ्या लोकांचा हेतू पूर्ण होता कामा नये.
भदरसा बलात्कार प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांची डीएनए चाचणी करुन पीडितेला न्याय द्यायला हवा. फक्त आरोप करुन राजकारण होता कामा नये. १२ वर्षीय पीडितेच्या बलात्कार प्रकरणाचं राजकारण कुणीही करु नये. तसंच पीडित कुटुंबाला २० लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे. अखिलेश यादव यांनी डीएनए चाचणीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.
केशव मौर्य काय म्हणाले?
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना वाटतं आहे की आपण अशा मागण्या केल्या नाहीत तर आपली व्होट बँक नाराज होईल. डीएनए चाचणी मागणी करुन न्यायालयाची दिशाभूल करु नये. जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे केशव मौर्य यांनी स्पष्ट केले.
अयोध्येची घटना नेमकी आहे काय?
अयोध्येतल्या कलंदर पोलीस ठाणा भागात १२ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. तसंच त्या मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार करुन तिला वारंवार ब्लॅकमेल केले. दीर्घकाळ हा गुन्हा घडला, ज्यानंतर १२ वर्षांची पीडिता गरोदर राहिली. अडीच महिन्यापूर्वी ही पीडिता शेतात काम करुन परतत होती. त्यावेळी राजू नावाचा एक माणूस तिला भेटला त्याने तिला सांगितलं की बेकरी मालक मोईद खान यांनी तुला बोलवले आहे. ही पीडिता मोईद यांनी बोलवले आहे म्हणून गेली, तेव्हा मोईदने तिच्यावर बलात्कार केला. राजूने त्याचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर राजूनेही या मुलीवर बलात्कार केला. या दोघांनी दीर्घकाळ त्या मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार केला. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.
मोईद खान अन्सारी हा समाजवादी पार्टीचा स्थानिक नेता आहे. तो खासदार अवधेश पासी आणि अफजल अन्सारी यांचा निकटवर्तीय आहे. तो अयोध्येत बेकायदा बेकरी चालवायचा. पण योगी सरकारने त्या बेकरीवर बुलडोझर चालविला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more