Sharad Pawar : “वर्षा”वरची अदानींची अंदर की बात एका ओळीची; प्रत्यक्षात पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट साखर कारखानदारांसाठी!!

sharad pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चा झडत असताना राज्यातील गाठीभेटी रंगल्या आहेत. त्यातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेगवेगळ्या भेटी घेतल्या. sharad pawar meeting with chief minister eknath shinde for sugar factories of his party

यातल्या पवार – मुख्यमंत्री भेटीची बातमी मराठी माध्यमांनी अदानींची अंदर की बात म्हणून मीठ मिरची लावून रंगवली. प्रत्यक्षात पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, ती वेगळ्या कारणासाठी होती. पवारांनी जाता जाता अदानींची काही माणसे वर्षा बंगल्यावर दिसली, एवढाच उल्लेख केल्याबरोबर पवारांनी हिंट दिल्यासारख्या बातम्या मराठी माध्यमांनी रंगवून सांगितल्या.

प्रत्यक्षात पवारांनी मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली होती, ती साखर कारखानदारांसाठी. शिंदे – फडणवीस सरकारने 11 साखर कारखानदारांची कर्ज थकहमी घेतली. ते सगळे कारखानदार महायुतीशी संबंधित असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, ती ज्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना निवडणुकीत मदत केली, त्या साखर कारखानदारांच्या मदतीसाठी.

शरद पवार यांनी 8 दिवसांत दोनवेळा मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतलीह एकीकडे मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. मात्र, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे, आजच्या भेटीत या प्रकल्पावर चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, शरद पवार यांनी त्या चर्चेचा इन्कार केला.


पवारांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन राज्यातील मराठा + ओबीसी आरक्षणावर चर्चा केली होती. पण कालच्या भेटीत तो विषय देखील नव्हता. विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर या प्रकल्पाबाबत प्रेझेंटेशन झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या विषयावरून महाविकास आघाडीत मत भिन्नता तर नाही ना अशी चर्चा समोर आली आहे. या विषयासंदर्भात शरद पवार यांच्याशी संवाद साधला असता, अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचा त्यांनी दावा केला. मात्र, ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली, त्यानंतर वर्षा निवासस्थानाबाहेर निघत असताना अदानींशी संबंधित काही व्यक्ती येथे आल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली. त्यामुळे माध्यमांनी अंदर की बात म्हणून बातमी रंगवली.

साखर कारखान्यांबाब नाराजी

दरम्यान, मागच्या भेटीत, साखर कारखान्यांबाबत कुणाच्याही कारखान्यावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन शरद पवारांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिले होते. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक बापू पवार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि विधान परिषदेची निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे, शरद पवारांनी प्रेमाने सांगून जर मागणी मान्य होत नसतील तर आम्ही संघर्ष करू, अशी भूमिका या आमदारांनी घेतली होती. त्यावर या आमदारांच्या साखर कारखान्यांच्या मदतीसाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी पवारांच्या विनंतीनुसार सुप्रिया सुळेंचे काम केले होते.

sharad pawar meeting with chief minister eknath shinde for sugar factories of his party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात