याआधी 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. हॉकीच्या अखेरच्या गट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. यासह भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑलिम्पिकमधील विजयाचा 52 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. याआधी 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघ ब गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय हॉकी संघ आता 4 ऑगस्ट रोजी उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहे. भारताची स्पर्धा अ गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाशी (A3) होईल. अ गटात जर्मनी आणि ब्रिटन दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहू शकतात. अ गटातून नेदरलँड आणि स्पेननेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
ब गटात भारत आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त बेल्जियम आणि अर्जेंटिना हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. चारही सामने जिंकून बेल्जियम या गटात पहिल्या क्रमांकावर आहे. भारत (10) दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया (9) तिसऱ्या आणि अर्जेंटिना (7) चौथ्या क्रमांकावर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more