राज्यसभा सदस्यत्वाचा दिला होता राजीनामा BJD leader Mamata Mohanta enters BJP
विशेष प्रतिनिधी
नवा दिल्ली : लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने बिजू जनता दलाचा पराभव केला आहे. आता माजी राज्यसभा खासदार आणि बीजेडी नेत्या ममता मोहंता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात मोहंता भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत.
मोहंता यांनी एक दिवस आधी 31 जुलै 2024 रोजी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी मोहंता यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे.
ममता मोहंता यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर आज 1 ऑगस्ट 2024 रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. ममता 2020 मध्ये बीजेडीच्या वतीने राज्यसभेत पोहोचल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता.
Ashwini Vaishnav :’आम्ही रील बनवणारे नाही, काम करणारी माणसं आहोत’ ; रेल्वेमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं!
ममता भाजपमध्ये गेल्याने भाजपला राज्यसभेत फायदा होईल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. वास्तविक, राज्यसभेत एकूण 245 सदस्यांच्या जागा आहेत. मात्र, सध्या केवळ 225 खासदार आहेत. मोहंता यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता निवडणूक होणार आहे. ओडिशा विधानसभेत भाजपचे बहुमत असल्याने ही जागा भाजपच्या खात्यात जाणार आहे. याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. ओडिशात राज्यसभेच्या 10 जागा आहेत पण सध्या भाजपच्या खात्यात फक्त एक खासदार आहे.
भाजपमध्ये दाखल झालेल्या ममता म्हणाल्या की, मी कोणत्याही षडयंत्रामुळे भाजपमध्ये प्रवेश केला नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्शांनी प्रेरित आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने लोकांची सेवा करतात ते मला प्रेरणा देते. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीजेडीमध्ये त्यांची दीर्घकाळापासून उपेक्षा केली जात होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App