हे ऐकून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू प्रचंड तणावात असणार आहेत. killing of Hamas chief Ismail Haniyeh
विशेष प्रतिनिधी
बेरूत : हमास या दहशतवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हनियाच्या ( Ismail Haniyeh) हत्येनंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे पहिले अधिकृत वक्तव्य समोर आले आहे. यामध्ये अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी तेहरानमध्ये हमास नेते इस्माईल हनीया यांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे. त्याचवेळी इस्रायलला मोठी धमकी देण्यात आली आहे, हे ऐकून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू प्रचंड तणावात असणार आहेत.
इस्त्रायलने आपला सर्वात मोठा शत्रू आणि हमास या दहशतवादी संघटनेचा मुख्य कमांडर इस्माइल हनियाला हवाई हल्ल्यात ठार केले आहे. हानिया इराणमध्ये लपून बसला होता. काही दिवसांपूर्वीच इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियान यांच्यासोबतचे त्यांचे छायाचित्रही समोर आले होते.
जरांगेंच्या फडणवीसांना पुन्हा शिव्या; पण सरकारने आण्णासाहेब पाटील महामंडळाचे 1 लाख मराठा लाभार्थ्यांचे टार्गेट पूर्ण केले पाहा!!
इस्माईल हनियाच्या हत्येनंतर इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये खेद व्यक्त केला. हमासने हनिया उर्फ हनीयेहच्या हत्येसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, इस्रायलने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्याने हमासचा दहशतवादी इस्माईल हानियाला ठार केल्याचा दावा केला आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ.मसूद पेजेश्कियान यांचे धमकीचे वक्तव्य समोर आल्यानंतर इस्रायलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक प्रमुख उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच हवाई मार्गांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. इस्त्रायल-हमासच्या युद्धविरामाच्या प्रयत्नांदरम्यानही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे सतत सांगत होते की हमासचा संपूर्ण नाश करणे हे त्यांचे अंतिम लक्ष्य आहे. या आधी पूर्ण युद्धविराम शक्य नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App