‘आज पुन्हा राहुल गांधी आणि काँग्रेसची अपरिपक्वता जनतेसमोर उघड झाली ‘


केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लगावला टोला Union Minister Dharmendra Pradhan criticized Rahul Gandhi and Congress

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (29 जुलै) लोकसभेत केलेल्या भाषणात केंद्र सरकारवर निशाणा साधला. यादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाच्या हलवा समारंभाचे पोस्टर दाखवले. याबाबत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी एका पोस्टमध्ये लिहिले आहे काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक सभागृहाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले की, ‘विरोधी पक्षाचे नेते या नात्याने, सर्वप्रथम राहुल गांधी यांना सभागृहाच्या मर्यादेत विधान कसे करायचे याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलीत भाषण करणे आणि संसदेत भाषण करणे यात फरक आहे, आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही राहुल गांधींना पोस्टमध्ये सल्ला दिला. त्यांनी लिहिले की, ‘विरोधी पक्षनेत्याने सभागृहाचे नियम नीट समजून घेऊन त्यानुसार वागण्याची गरज आहे. सभागृह हे राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असते, स्वतःच्या राजकारणासाठी संसदेच्या पावित्र प्रतिष्ठेची खिल्ली उडवणे निषेधार्ह आहे.

Union Minister Dharmendra Pradhan criticized Rahul Gandhi and Congress

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात