मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पहिल्या रांगेतील स्थानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबासह पंतप्रधानांच्या भेटीला!!

Devendra Fadnavis met with Prime Minister Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानीत नीती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. त्यानंतरच्या ग्रुप फोटोमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या समावेत पहिल्या रांगेत बसले. या निमित्ताने भाजप मधला फडणवीसांचा वरच्या दर्जाचा प्रोटोकॉल जनतेसमोर आला. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा परिषदेचा हा फोटो ग्रुप फोटो सगळीकडे गाजला. Devendra Fadnavis met with Prime Minister Narendra Modi

त्या फोटो पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी 7, लोक कल्याण मार्ग येथे आपल्या कुटुंबासह भेटीला पोहोचले. पत्नी अमृता आणि मुलगी दीविजा यांच्यासह फडणवीस यांनी मोदींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून फडणवीस कुटुंबीयांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले, असे ट्विट फडणवीस यांनी या कौटुंबिक भेटीनंतर केले. अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना शिवशंकरांची ध्यानस्थ मूर्ती भेट दिली.

महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा निवडणुकीतला महायुतीचा घसरलेला परफॉर्मन्स, महाविकास आघाडीचे निर्माण झालेले आव्हान, त्याचवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना संघटनात्मक पातळीवर बळ दिल्याचे मानण्यात येत आहे. त्याचेच द्योतक म्हणून फडणवीसांना ते उपमुख्यमंत्री पदावर असताना देखील मुख्यमंत्री परिषदेत बोलवण्यात आले. त्याचबरोबर ग्रुप फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रांगेत सन्मानाचे स्थान देण्यात आले.

नीती आयोगाच्या सरकारी बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते, पण भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत मात्र पंतप्रधानांसमवेत देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आणि त्या पाठोपाठ ग्रुप फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या रांगेतच त्यांना स्थान देण्यात आले. त्यानंतर फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधानांची भेट घेतली. यातून देवेंद्र फडणवीस यांचे भाजप संघटनेतले बळकट स्थान अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे.

Devendra Fadnavis met with Prime Minister Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात