विशेष प्रतिनिधी
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आणि शरद पवार यांची छुपी युती संपूर्ण महाराष्ट्रासमोर “एक्सपोज” झाल्यानंतर पवारांनी महाराष्ट्रात लोकांशी संवाद साधण्याची भूमिका जाहीर केली, पण त्याचवेळी शिंदे – फडणवीस सरकारच्या चुका काढल्या. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन वगैरे नेत्यांनी आम्ही दुटप्पी भूमिका घेत नाही. लपून छपून काही करत नाही जे करायचे ते उघड करतो. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, अशा शब्दांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून पवारांच्या भूमिकेचे वाभाडे काढले. Sudhir mungantiwar targets sharad pawar over his dismissal political performance
पण पवारांनी दुसऱ्या एका पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्यावर टीका करताना त्यांनी कोणता दिवा लावला आणि तो गुजरात मधून तडीपार झालेला दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात कसा होता हे आम्ही पाहिले आहे, असे शरसंधान साधले होते. अमित शाह यांनी पुण्यातल्या भाजप मेळाव्यात शरद पवारांना “भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार” म्हटले होते. त्याला पवारांनी “तडीपार दिवा गृहमंत्री म्हणून बसलेत”, असे प्रत्युत्तर दिले. मात्र राज्याचे आणखी एक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांचा सगळा अपयशी राजकीय इतिहास काढून त्यांना प्रत्युत्तर दिले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App