विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांनी पाठिंबा दिला, तरीही शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत पाडला. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार फक्त 12 आमदारांची मते मिळवून देऊ शकले. त्यामुळे महाविकास आघाडीतील छोटे पक्ष दुखावले असून ते महाविकास आघाडीपासून तुटत चालले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टीने विधानसभा निवडणुकीसाठी यातूनच स्वबळाचा नारा दिला आहे. CPI left MVA, to contest maharashtra assembly elections alone
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने शेकाप, दोन्ही कम्युनिस्ट पार्टी, लाल निशान पक्ष आणि बाकीच्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुतीपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या. त्यावेळी सर्व छोट्या बैठक पक्षांना विधानसभा निवडणुकीत विशिष्ट जागा देऊन सामावून घेऊ, असे आश्वासन महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्यांनी दिले होते, पण विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांना शेकापच्या जयंत पाटलांना निवडून आणता आले नाही. त्याऐवजी उद्धव ठाकरेंचे पीए शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर निवडून आले.
या राजकीय घडामोडीमुळे छोटे पक्ष दुखावले. म्हणूनच भारतीय कम्युनिस्ट पार्टीने महाविकास आघाडी पासून दूर होत विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. महाराष्ट्रात 16 जागा स्वबळावर लढवण्याचा त्यांचा इरादा आहे. यात विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतल्या एकूण 16 जागांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ठरविले. या बैठकीला 60 नेते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने कॉम्रेड श्याम काळे, अरुण वनकर, युगुल रायलू आणि संजय राऊत यांचा समावेश होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App