आरक्षणावर पवारांना संवादाची उपरती झाल्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला; आम्ही लपून छपून काही करत नाही!!

Provide internship opportunities to candidates in every government office

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्ष उभा राहिला. सरकारने मराठ्यांना 10 % आरक्षण दिल्यानंतरही ते अमान्य करत मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षणाचा हट्ट धरला. ते कायम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपलाच धारेवर धरत राहिले, पण हळूहळू मनोज जरांगे आणि शरद पवार यांची छुपी युती एक्सपोज व्हायला लागली. CM eknath shinde exposed manoj jarange – sharad pawar nexus!!

मनोज जरांगे फक्त फडणवीसांना टार्गेट करतात. शरद पवार किंवा बाकीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही बोलत नाहीत, असा सगळीकडून भडीमार झाल्यानंतर शरद पवारांनी संवादाची भाषा सुरू केली. एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना आणखी एक्सपोज केले. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांचे परखड शब्दात वाभाडे काढले



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले :

आम्ही जे बोलतो ते जाहीरपणे बोलतो. आम्ही लपूनछपून करत नाही. आरक्षणाच्या संदर्भात आधी आमची जी भूमिका होती, तीच कायम आहे. कुणी कुणावर आरोप करू नये. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले. उच्च न्यायालय टिकवले होते, पण सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर सरकार बदललं. तेव्हा महाविकास आघाडीने हे आरक्षण टिकवले नाही. जेव्हा जेव्हा विरोधकांना संधी होती, तेव्हा तेव्हा त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीचे मराठा नेते राज्यकर्ते झाले. पण मराठा समाजाला वंचित ठेवले. जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही.

महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर आम्ही मराठा आरक्षण दिले. कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. योजनांचा लाभ देत आहोत. आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला. तेव्हा 5000 लोकांच्या नोकरीचा प्रश्न रेंगाळला होता, आधीचे सरकार नोकरी देण्यास घाबरले. पण आम्ही नोकरी दिली. निर्णय घेतला.

आमची जशी भूमिका आहे. तशी सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे. राजकीय फायद्यासाठी कुणालाही वेठीस धरू नका. निवडणुका येतात आणि जातात. कोणत्याही समाजाला आपल्या फायद्यासाठी वापरू नका. ओबीसींवर अन्याय करायचा नाही, ही भूमिका आमची काल होती, आजही आहे. सर्वांना खुले आवाहन आहे. या. बसून चर्चा करा. तुमच्या मागण्या सांगा. आपण अनेक प्रश्नावर काम केलं आहे. ज्यांना कुणाला चर्चा करायची आहे, जरांगे असतील किंवा ओबीसी नेते असतील किंवा राजकीय नेते असतील, सर्वांनी या. या प्रश्नात मार्ग काढला पाहिजे.

लाडकी बहीण योजनेबाबत अफवा उठवल्या जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या विरोधकांच्या वावड्या आहेत. विरोधकांना पोटदुखी झाली आहे. आम्ही जी लाडकी बहीण योजना सुरू केली, गॅस सिलिंडरची योजना सुरू केली, या सर्व योजना विरोधकांना हजम झाल्या नाहीत. त्यांना हजमोला दिला पाहिजे. हे महिलांचे सावत्र भाऊ आहेत. महिलांना पैसे मिळू नयेत म्हणून खोडा घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण सरकार म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही पैशाची तरतूद केली आहे. आम्ही निर्णय घेतल्यावर प्रिंटिंग मिस्टेक किंवा चुनावी जुमला म्हणत नाही. आम्ही महिला आणि ज्येष्ठांना एसटी भाड्याची सवलत दिली तेव्हा काय निवडणुका होत्या का?? लाडक्या बहिणी आणि भावाने तुमचे विरोधक कोण आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.

CM eknath shinde exposed manoj jarange – sharad pawar nexus!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात